१ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे. गेले ३ वर्षे ज्ञानभाषा मराठी तर्फे हा पंधरवडा नेहमीच्या पठडीतले विषय न घेता इतर वेगवेगळ्या विषयांची निवड करून साजरा केला जात आहे आणि शासनाला अशा नवनवीन उपक्रमांची आम्ही माहिती देत आहोत.
■◆◆◆■◆◆◆■◆◆◆■◆◆◆■
नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, तसेच शब्दाचा उगम शोधू नये म्हणतात. त्याला कारण म्हणजे आपल्या भाषेत इतर भाषांमधले असंख्य शब्द आलेले असतात. मराठीने देखील संस्कृत, फारसी, कानडी, गुजराती, इंग्रजी, पोर्तुगीज ई. अशा अनेक भाषांमधून विविध शब्द निःसंकोचपणे स्वीकारून स्वतःला समृद्ध केले आहे आणि यापुढेही करत राहील. असेही म्हणतात आजोबांच्या मराठीत, वडिलांच्या मराठीत आणि नातवाच्या मराठीत बराच फरक असतो. पण तरीही हे तिघे मराठीतूनच बोलत असतात हे विशेष. अर्थात, मराठी ही प्रवाही भाषा आहे. त्यातील शब्द बदलत राहतील पण तिचा बाज तोच राहतो.
थोडी गंमत, थोडा अभ्यास, थोड्या चर्चा, थोडी बुद्धीला चालना म्हणून आपण मूळ शब्द शोधा हा उपक्रम मराठी पंधरवड्यात घेत आहोत. पूर्ण १५ दिवस या उपक्रमात तुम्हाला रोज सकाळी ३ शब्द दिले जातील तुम्हाला दिवसभर शोधाशोध करून त्या ३ शब्दांचे मूळ शब्द शोधून काढायचे आहेत. उत्तरे रोज रात्री पोस्ट केली जातील.
मग आहात ना तुम्ही तयार, आमच्यासोबत या मराठीच्या रत्नांशी खेळायला?
अधिकाधिक मित्र-परिवाराला ज्ञानभाषामराठी च्या whatsapp गटांशी जोडून घ्या....गटात प्रवेशासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
सुचिकांत वनारसे-९०५२३४४४७६
अजित तिजोरे-८०९७६१७०२०
मृणाल पाटोळे-७६०६९१९८१६
अजित तिजोरे-८०९७६१७०२०
मृणाल पाटोळे-७६०६९१९८१६
■◆◆◆■◆◆◆■◆◆◆■◆◆◆■